पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

143

पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुणे नाशिक महामार्गावर आणखी एक अपघात घडला आहे. वाकी गावच्या हद्दीत हा अपघात झाला असून एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजता घडला.

रवी मलप्पा कलकेरी (वय 43, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात फिर्यादी यांचा सख्खा भाऊ विजय मलप्पा कलकेरी (वय 30) याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ विजय त्यांच्या दुचाकीवरून चाकणकडून पुण्याकडे येत होते. वाकी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये विजय हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून निघून गेला. या अपघातात विजय यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे तपास करीत आहेत.