पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची मराठा आंदोलकांकडून तोडफोड; पोलिसांवर केली चप्पल फेक

3122

पुणे, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान सकाळीच्या सुमारास पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यादरम्यान काही हिंसक घटना घडल्या.

काही आक्रामक आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने पोलिसांवर काचाच्या बाटल्या आणि चप्पल फेक केली. तसेच काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा, दिवे फोडले तर काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य प्रवेशव्दार तोडण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भितीचे वातावरण असून पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.