पुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग

570

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे प्रशासकीय कामकाज स्वातंत्र्यदिन (दि.१५ ऑगस्ट) पासून सुरु करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी चार पोलीस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, तेरा उपनिरीक्षक असे एकूण तेवीस पोलिस कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग केले आहेत. यामध्ये चार पोलीस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, तेरा उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी काढलेल्या आदेशामध्ये पोलीस निरीक्षक अमरनाथ रामचंद्र वाघमोडे, धन्यकुमार चांगदेव गोडसे, प्रकाश गणपतराव धस, मुगुटलाल भानुदास पाटील, सहायक निरीक्षक साधना शंकरराव पाटील, तृप्ती बाजीराव बोराटे, शाहिद सय्यद पठाण, नवनाथ बिभीषण रानगट, उद्धव रायसिंग खाडे, अजित धोंडीराम दळवी यांना तर उपनिरीक्षक संजय धोंडीराम निलपत्रेवर, कमलाकर किसनराव भोसले, बजरंग राणूसिंग बाडीवाले, हनुमंत शंकर काटकर, जालिंदर आबाजी जाधव, सुजातअली लिआयतअली इनामदार, सतीश ए. डोले, विक्रम रामचंद्र पासलकर, प्राची गोरख तोडकर, अबूबकर म्हमुलाल लांडगे, दिलीप नारायण कोंडेदेशमुख, अरविंदकुमार भिमराव हिंगोले आणि संतोष लांडे या सर्व अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे.