पुणे-औरंगाबाद शिवशाही बसचा रांजणगाव येथे भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी

192

पुणे, दि. १५ (पीसीबी) – पुण्याहुन-औरंगाबादला जाणाऱ्या शिवशाही बसचा रविवारी (दि.१४) रात्री रांजनगाव येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह जवळपास १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास पुण्याहुन-औरंगाबादला जाणारी शिवशाही बस (क्र.एमएच/१८/बीजी/१३६०) पुणे-नगर महामार्गावरुन जात होती. राजणगाव येथे ही बस आली असता बस चालकाचे बसवरील अचानक नियंत्रण सुटले आणि बस समोरच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर १०८ या रुग्णवाहिकेतून सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, शिवशाही बसचा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत या बसच्या बनावटी बाबत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.