पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हुक्का बारवर धाड; हुक्का पिणाऱ्यांवर कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई

419

पुणे, दि. ८ (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या तब्बल सात हॉटेलांमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.६) सायंकाळी सहा ते रात्री उशीरा दोन पर्यंत गुन्हे, आर्थिक, सायबर, आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनी केली.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी कोंढवा, मुंढवा, कोरेगावपार्क, डेक्कन, हिंजवडी या पोलिस स्टेशन हद्दीतील कार्निवल, शिशा, मल्ली बु कॅफे, होलीस्मोक, हुक मी-अप, कॅस्नोव्हा, द व्हिलेज या सात हॉटेलांवर धाड टाकली. यावेळी हॉटेलांमध्ये एकूण ५५ जण हुक्का पिताना पोलिसांना आढळून आले पोलिसांनी त्यांच्यावर ‘कोटपा’ कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे.