“पीसीबी”तर्फे घरगुती गणेश सजावट स्पर्धा; स्मार्टफोन आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

521

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – “पिंपरी-चिंचवड बुलेटीन” अर्थात “पीसीबी”च्या वतीने घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला स्मार्टफोन जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्याला आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे.

पाहता-पाहता गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी घरगुती गणेशाचीही सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या घरगुती देखाव्यांना प्रसिध्दी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे तसेच घरगुती गणेश सजावटीसाठीच्या कौशल्य, कला, गुणांना अधिकाधिक वाव मिळावा यासाठी “पीसीबी”च्या वतीने (www.pcbtoday.in) घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास स्मार्टफोन, व्दितीय क्रमांकास ज्युसर आणि तृतीय क्रमांकास डिनर सेट बक्षीस स्वरुपात दिला जाणार आहे. तसेच चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिस दिले जाईल. तुम्ही केलेली गणेश सजावट “पीसीबी”कडून फेसबुक लाइव्हद्वारे शहरातील हजारो प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात येईल. “पीसीबी”चे वृत्त संकेतस्थळ, मोबाईल अॅप तसेच फेसबुकपेजवरही स्पर्धकांच्या सजावटीला प्रसिध्दी दिली जाणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर बक्षिस वितरण “पीसीबी”च्या कार्यालयात होईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

स्पर्धेत सहभागी होण्याची पध्दत एकदम सोपी आणि सोईस्कर आहे. आपल्याला केवळ “पीसीबी” प्रतिनिधीच्या 9850581649 या वॉटस्‌अॅप क्रमांकावर आपल्या सजावटीचे छायाचित्र, सजावटीचे वैशिष्ट्य काय आहे याविषयीची थोडक्यात माहिती पाठवायची आहे. [email protected] या मेल आयडीवरही तुम्ही छायाचित्र व माहिती पाठवू शकता. अधिक माहितीसाठी 9850581649 याच क्रमांकावर संपर्क साधावा.