पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून रोकड लंपास

17

निगडी, दि. १० (पीसीबी) – निगडी ते कात्रज या दरम्यान पीएमपीएमएल बस मधून प्रवास करत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये चोरले. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली.

बाजीराव पिरताजी गोरडे (वय 65, रा. सातारा रोड, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्याद निगडी ते कात्रज या पीएमपीएमएल बस मधून प्रवास करत होते. बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅंटच्या खिशातून तीस हजार रुपये रोख रक्कम काढून चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare