पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला दिघीतून अटक; चार पिस्तुल आणि १५ काडतुसे जप्त

598

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – दिघीतील मॅगझीन चौकात एक तरुण सराईत गुन्हेगार बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या टोळीला पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून सिद्धार्थ ऊर्फ रौनक रिपुमन शर्मा (२२, रा. दिघी. मूळगाव बिहार) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून तब्बल चार पिस्तुल आणि १५ काडतुस जप्त करण्यात आली. गुप्ता आणि पांडे हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. आगामी विधानसभा निवडणुक काळात पिंपरी-चिंचवड शहरात रक्त तांडव होऊन नये म्हणून ही कारवाई म्हत्वाची मानली जात आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी, राहुल खारगे, सागर जैनक, सचिन मोरे, गंगाधर चव्हाण, योगेश आढारी, अरुण नरळे यांच्या पथकाने केली.

WhatsAppShare