पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

87

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – बेकायदेशीपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) दुपारी सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

अजय बिंदू माधव सातपुते (वय 25, रा. हिंजवडी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथे येलवे अमृततुल्य जवळ एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. अशी माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत आरोपी अजय याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक लोखंडी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 40 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare