पिंपळे सौदागर येथे कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्पाचे नगरसेवक श्री.शत्रुघ्न(बापु)काटे यांच्या हस्ते उदघाटन

178

चिंचवड,दि.२३(पीसीबी) – आज(२३ फेब्रुवारी) OPEL PRO SCRO मार्फत पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज- २ सोसायटी मध्ये साधारण ४५० फ्लॅट मधील ओल्या कचऱ्यापासुन ४५० किलो क्षमता वजनी कंम्पोस्ट खत निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन नगरसेवक श्री.शत्रुघ्न(बापु)काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की ,” पिंपळे सौदागरची स्मार्ट सिटी साठी करण्यात आलेली निवड ही पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी सतत आपल्या सहभागातून/योगदान मार्फत योग्य ठरवली आहे. प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत बरोबरीने ओला कचरा विल्हेवाट या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिकेला करत असलेल्या या अमूल्य सहकार्य बद्दल तसेच जनजागृती बद्दल विशेष आभार”.

स्मार्ट सिटी ही फक्त पायाभूत सुविधेमुळे स्मार्ट होत नसते तर ती सुविधा भोगणारी जनशक्ती सुद्धा स्मार्ट असावी लागते आणि पिंपळे सौदागर वासीयांनी हे स्मार्टपणा सतत सिद्ध करून दाखवले आहे, असं काटे यावेळी म्हणाले.

“सौदागर मधील काही सोसायटी मध्ये कंपोस्ट खत प्रकल्प राबविण्यात आले आहे तरी परिसरातील इतर सोसायटी आणि गृहनिर्माण संस्थानी देखील अश्याच पद्धतीने कंपोस्ट खत प्रकल्प राबवावे तसेच यामध्ये तयार होणाऱ्या खताचा आपल्याच सोसायटी परिसरातील गार्डन मध्ये वापर करता येईल. तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी सकारात्मक आहे.” असंही काटे यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी गणेशम फेज- २ सोसायटीचे चेअरमन श्री.भानुप्रकाशजी,श्री.जितेंद्र लोडम, श्री.प्रदीप भुटाडा, श्री.दिपक केल्हे व इतर सभासद उपस्थित होते.