पिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांनावर कारवाई; रोख ४५ हजार जप्त

558

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीजवळ असलेल्या पत्राशेडमध्ये पैसे लावून मोठ्या प्रमाणात जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती युनीट चारच्या पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. यावर पोलिसांनी मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास तेथे धाड टाकली. पोलिसांना तेथे तेराजण तीन पत्ती खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन तब्बल ४५ हजार २०० रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केले आहे.

अरविंद नागनाथ साबळे (वय ४२, रा. रमाबाईनगर, पिंपरी), संदीप सुरेश कांबळे (वय ५२, रा. विशाल आंगण जवळ, पिंपरी), दिलीप महातप्पा स्वामी (वय ५९, रा. अमरदिप कॉलनी, पिंपळे सौदागर), पोपट धर्मराज धेंडे (वय ३८, रा. पिंपळे सौदागर), विकास परमेश्वर वामने (वय १९, रा. पिंपळे सौदागर), सागर दिनकर मोरे (वय २९, सुसगाव), संदीप अंबादास साळवे (वय १८, रा. पिंपळे सौदागर), प्रविण भारत मस्के (वय १९, रा. पिंपळे सौदागर) , शिवाजी बाळासाहेब बाबर (वय २८, रा. काटेवस्ती, पिंपळे सौदागर), निलेश विश्वनाथ शिंदे (वय ३३, रा. दापोडी), सुखदेव बाबुराव सोनवणे (वय ५६, औंध रोड, खडकी), इब्राहिम जावेद खान (वय ४९, रा. नानापेठ, पुणे), आणि भारतकुमार लखन पंडित (वय २४, रा. येरवडा) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीजवळ असलेल्या पत्राशेडमध्ये पैसे लावून मोठ्या प्रमाणात जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती युनीट चारच्या पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. यावर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून तेरा जणांवर कारवाई केली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून तब्बल ४५ हजार २०० रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेल्या काही आरोपींवर यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकराचे गुन्हे दाखल आहेत असे समजते.