पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅट फोडून सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

163

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरु नेला आहे. ही घटना रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील नम्रता सेटेलाईट अपार्टमेंट या इमारतीतील फ्लॅट क्र.६०१ येथे घडली.

याप्रकरणी घरमालक मयंक ओमप्रकाश चंद (वय २९) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा फिर्यादी मयंक चंद यांचा पिंपळे सौदागर येथील नम्रता सेटेलाईट अपार्टमेंट या इमारतीतील फ्लॅट क्र.६०१ हा अज्ञात चोरट्यांनी फोडून फ्लॅटच्या कपाटातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २९ हजारांचा ऐवज चोरु नेला. चंद हे घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी तातडीने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस.ए.बागुल तपास करत आहेत.