पिंपळे निलख येथे ९८ हजारांची घरफोडी

116

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – फ्लॅट कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलुप तोडून आत प्रवेश केला तसेच घरातील ८० हजारांची रोख आणि १८ हजारांच्या ६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ९८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना रविवार (दि.१२) ते सोमवार (दि.१३) या दरम्यान पिंपळे निलख येथील आकाश गंगा अपार्टमेंट बी बिल्डींग फ्लॅट क.३/ए येथे घडली.

याप्रकरणी जयंत एकनाथ वाघुले (वय ३७, रा. आकाश गंगा अपार्टमेंट, बी बिल्डींग फ्लॅट क्र. ३/ए, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघुले यांचे पिंपळे निलख येथील घर कुलुप लावून बंद असताना रविवार (दि.१२) ते सोमवार (दि.१३) या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील ८० हजारांची रोख आणि १८ हजारांच्या ६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ९८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.