पिंपळे निलख येथील घरातून चोरट्यांनी चोरले चांदीचे भांडे

134

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत चांदीची भांडी एअरटेल आणि जिओ कंपनीचे डेटा कार्ड चोरून नेले. ही घटना सोमवार (दि.१३) सकाळी पाचच्या सुमारास पिंपळे निलख येथून उघडकीस आली.

याप्रकरणी रवी रामचंद्र पवार (वय ३६, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी पवार हे बुधवारी (दि. ८) सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलुप लावून बाहेर गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. आणि घरातील चांदीची भांडी, एअरटेल आणि जिओ कंपनीचे डेटा कार्ड असा एकूण ५ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. रवी सोमवारी सकाळी पाच वाजता घरी आले, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती सांगवी पोलिसांना दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.