पिंपळे गुरव येथील पवना नदीत एकाने घेतली उडी

108

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळ असलेल्या पुलावरुन एकाने पवना नदीत उडी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेबाबत पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली असून रहाटणी आणि संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. संबंधीत व्यक्तीचा नदीत शोध घेतला जात आहे. ती व्यक्ती कोण होती, त्याने नदीत का उडी घेतली हे अद्याप स्पष्ट नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…