पिंपळे गुरव येथील घरातून दहा लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

121

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० लाख ५ हजार ७०६ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना सोमवारी (दि.२०) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील भैरवनाथनगरमधील कविता प्रोव्हिजन स्टोअर या दुकाना समोरील घरात घडली.

याप्रकरणी सारिका संदीप विटकर (वय ३३, रा. कविता प्रोव्हिजन स्टोअर समोर, भैरवनाथनगर, पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सारिका या पिंपळे गुरव येथील भैरवनाथनगरमधील कविता प्रोव्हिजन स्टोअर या दुकाना समोरील घरात राहतात. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने काही अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन त्यांच्या कपाटातील लॉकरची चावी घेऊन लॉकरमधे ठेवलेले तब्बल १० लाख ५ हजार ७०६ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम चोरुन नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ तपास करत आहेत.