पिंपळेसौदागर व रहाटणीत नगरसेवक काटे व नगरसेविका कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

150

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपळेसौदागर-रहाटणी परिसरात देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिन बुधवारी (दि. १५) उत्साहात साजरा करण्यात आला. अण्णासाहेब मगर माध्यमिक व प्राथमिक शाळेत भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या महापुरुष आणि हुतात्म्यांना अभिवादन केले. पिंपळेसौदागरमधील पी . के . इंटरनॅशनल स्कूल, रॅबिट अँड अटॉरटाईज  स्कूल, ब्ल्यू वूड्स, गणेशम फेज २, ओरीएट्स, साई व्हिजन, साई अॅम्बिअन्स, पीस वॅली, लक्षदीप, मयुरेश्वर, साई निसर्ग पार्क, सुखवानी सेलिनो, शिवसाई रस्ता येथील शिवम सोसायटी, साई मॅजेस्टिक सोसायटी, द्वारका फ्लोरा रेसिडन्सी येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, यशदा रिअॅल्टी चेअरमन संजय भिसे यांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले. प्रभागातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले .