पिंपळेसौदागर, रहाटणीत दिंडी काढून पर्यावरणाविषयी जनजागृती

68

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाउंडेशन व लोकमान्य हास्य क्लबच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेनेनिघालेल्या पालख्यांच्या निमित्ताने पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातील अबालवृद्धउत्साहाने सहभागी झाले होते.

यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, सुभाष कुंजीर, संजय कुटे, विजय पाटील, प्रमोद कुंजीर, हास्यक्लबचे संस्थापक सुभाष देसाई, समन्वयक मिणया मिरासे, शाखाप्रमुख दीपक मिरासे, अनंतवार, धोंडाप्पा कड़ते, रमेश वाणी, भागवत झोपे, विलास नगरकर व हास्य क्लबचे सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते.

निर्मला कुटे व संजय कुटे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलनामाच्या गजरात दिंडीची सुरवात करण्यात आली. दिंडीतसहभागी बाल वारकऱ्यांनी अभंग व नृत्य सादर करून प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश दिला. तसेच निर्मल दिंडी, निर्मल भारत, निर्मल परिसरअसा घोषणा देत पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली.