पिंपळेसौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

101

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पिंपळेसौदागर येथील महादेव मंदीरात एक दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पारायणास सोहळ्याची सुरूवात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे याच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच यंदा पाउस चांगला झाल्यामुळे पवनामाईचे (पवना नदी) जलपूजन करण्यात आले.

यावेळी शिवशंभो सेवा मंडळांचे संस्थापक हभप माउली हांडे, मंडळांचे अध्यक्ष गणेश काटे, जयसिंग चव्हाण, बाळासाहेब काटे, मंदीराचे पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे तसेच भाविक भक्त, ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.