पिंपळेसौदागरमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेला १५ सायकली व आर्थिक मदतीचे वाटप

0
476

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व पिंपळेसौदागर येथील रोझलँड रेसिडन्सीच्या वतीने दुष्काळग्रस्त व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे मोफत संगोपन व त्यांना शिक्षण देणाऱ्या स्नेहवन सेवाभावी संस्थेला १५ सायकलींचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे नगरसेवक नाना काटे व रोझलँड सोसायटीचे चेअरमन संतोष म्हसकर, व्ही. राममूर्ती, रमाकांत वाघुळदे यांच्या हस्ते स्नेहवन सेवाभावी संस्थेचे विश्वस्त अशोक देशमाने यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी रोझलँड सोसायटीचे आनंद दप्तरदार, कृष्णा, सिद्धार्थ नाईक, पत्रकार मिलिंद संधान, शिवप्रसाद डांगे यांच्यासह सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.