पिंपळेसौदागरमध्ये पंढरपूर देवस्थानचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांचा सत्कार

76

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कोषाध्यक्ष शेखर कुटे व भाजप नगरसेविका निर्मला कुटे यांच्या वतीने पंढरपूर देवस्थान ट्रस्टच्या सह अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गहिनीनाथ औसेकर महाराज यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपळेसौदागर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे, संजय कुटे, वाल्मिक कुटे, रंगनाथ फुगे, बाबासाहेब तापकीर, विजय जगताप, संजय भिसे, संदेश काटे, जेष्ठ किर्तनकार चैतन्य महाराज देगलुरकर, प्रमोद महाराज जगताप, महामंडलेश्वर लहवितकर महाराज, पुरूषोत्तम पाटील, योगीराज गोसावी, संस्थानचे विश्वस्त जंजाळ महाराज, चंद्रकांत वांजळे, संतोष पायगुडे, मृदंगमणी गंभीर महाराज, दातार गुरूजी, गायनाचार्य गरड गुरूजी, भगुरे गुरूजी, हभप येवले, हभप बुचूडे, इंगोले महाराज यांच्यासह पिंपळेसौदागर व परिसरातील वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.