पिंपळेसौदागरमध्ये नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण

82

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने पिंपळेसौदागर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पिंपळेसौदागरमधील नागरिक व लहान मुले उपस्थित होते.

नगरसेवक नाना काटे म्हणाले, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून त्यांनी कित्येक वर्षापूर्वी वृक्षाचे महत्व पटवून दिले आहे. त्याचप्रमाणे आजही वृक्षारोपणाची  अत्यंत गरज आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून समतोल राखायचा असेल, तर पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी झाडे लावण्याच्या कार्यात सक्रीय सहभाग घेऊन पर्यावरणाचे संरक्षण करावे. पावसाळ्यात प्रत्येकाने आपला परिसर हरित करण्याचे आवाहन त्यांनी केले.”