पिंपळेसौदागरमधील ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनकडून केरळसाठी पाच हजारांची मदत

132

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत असोसिएशनच्या वतीने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडे पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

पिंपळेसौदागर, जरवरी रोड येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कार्यालयात ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, फाऊंडेशनचे चेअरमन संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव पाटील, कार्याध्यक्ष रमेश वाणी, प्रदीप कुलकर्णी, बच्छाराज शर्मा आदी उपस्थित होते.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे डॉ. दिनेश पटेल व डॉ. मैत्रीया यांनी ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनच्या जेष्ठ नागरिकांना ऐच्छिक देहदानाविषयी मार्गदर्शन केले . नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी असोसिएशनला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपळेसौदागर प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच एक विरंगुळा केंद्र व सार्वजनिक शौचालय उभारण्याचे आश्वासन दिले.