पिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली

154

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – लोणी काळभोर येथून पिंपळेगुरवच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशाला कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी मारहाण करून १ लाख २० हजाराची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास नाशिकफाट्याजवळील काशिद पार्क चौकात घडली.

या प्रकरणी शैलेश काळभोर (वय ३६, रा. पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारमधील तीन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश यांचे लोणी काळभोर हे मुळ गांव आहे. ते गुरूवारी (दि. २१) सायंकाळी लोणी काळभोर येथून पिंपळेगुरवच्या दिशेने येत होते. यावेळी स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी शैलेश यांच्या समोर कार अडवी लावली. त्यानंतर शैलेश यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १ लाख २० किंमतीची सोन्याची साखळी  जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. सांगवी पोलिस तपास करत आहेत.