पिंपळेगुरवमध्ये अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

190

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डॉ. गजानन वाव्हळ यांच्या ’एक अनोखी शब्दमैफिल : आनंदाचे डोही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वाव्हळ यांनी विविध विषयावर विचार व्यक्त केले.

वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांना ५०० तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच पिंपळेगुरवमधील विठ्ठल भजनी मंडळ, जोगेश्वरी भजनी मंडळ, साधना भजनी मंडळ, भीमाशंकर भजनी मंडळ या भजनी मंडळांना टाळ, मृदुंग, वीणा, तबला, पेटी आदी भजनी साहित्य भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील गरजू गुणवंत विद्यार्थी समर्थ रामचंद्र पानसरे याचा शैक्षणिक आर्थिक मदत व सन्मान चिन्ह देऊन सन्मान, रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन फॉर नँशनल लेवलमध्ये सुवर्णपदक विजेती त्रिशा बंडेवार हिचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, ह.भ.प.विश्वनाथ वाखारे,  ह.भ.प तुकाराम महाराज, ह.भ.प तांदळे महाराज, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, पोलीस पाटील जयसिंगदादा पाटील, विजूअण्णा जगताप, नगरसेविका माई ढोरे, उषा मुंढे, साविता खुळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक नाना काटे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, उद्योजक बालाजी पवार, बिभिषण चौधरी, विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्ते श्यामजगताप, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, बाळासाहेब जवळकर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम, उद्योजक सतीश काशीद, मनिष कुलकर्णी, माधव मनोरे, संतोष जगताप आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे, वामन भरगांडे यांनी केले. तर सूर्यकांत कुरूलकर यांनी आभार मानले.