पिंपरी विधानसभेत पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा भापसेचे दीपक ताटे यांना पाठींबा

313

पिंपरी, दि. १६ (पीसीबी ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून पावसाने दिलेली उघडीप यामुळे पदयात्रा, रॅली, घरभेटीने मतदारसंघ ढवळून निघाला आहे. सर्वाधिक उमेदवार असलेला राखीव मतदारसंघ सध्या इतर मतदार संघापेक्षा अधिक चर्चिला जात आहे. त्या इथल्या आजी-माजी सदस्यांच्या कुस्तीमुळे. मात्र, नेहमी दुरंगी लढतीचे चित्र सध्या या मतदार संघात धुसर होत असून भापसे पार्टीचे दीपक ताटे यांनी सर्वसामान्य कष्टकरी मध्यमवर्गीय लोकांच्या जनआधारावर ही लढाई  सोपी ठेवलेली नसल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पहावयास मिळत आहे.

ताटे यांच्या वाढत्या जन आधारामुळे दुरंगी होणारी लढत आता तिरंगी होऊन भापसे पार्टी या मतदार संघाचे चित्र बदलेल अशी भावना सर्वसामान्य कष्टकरी मध्यमवर्गीयांमधून बोलले जात आहे. बहुभाषिक व विविध प्रांतातून आलेल्या कष्टकरी व्यापारी, उद्योजक एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून दीपक भाऊ ताटे यांच्याकडे वळला असल्याचे त्यांच्या जनसंपर्क व भव्य पदयात्रेतून पहावयास मिळत आहे. कष्टकरी बेघर नागरिकांनीच संघर्षाची ही लढाई हाती घेतल्याने भापसे या रणसंग्रामात विजयीपताका फडकविल असा विश्वास पक्षाचे प्रवक्ते बंडू ताटे यांनी व्यक्त केला.

आजी-माजी विद्यमान महाशयांना जनता कंटाळली असून पिंपरी विधानसभेतील अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. तर अनेक नागरी समस्या “आ” वासून उभ्या आहेत सक्षम कर्तव्यतत्पर नेतृत्व या मतदारसंघाला आजवर मिळालेले नसल्याने या मतदारसंघाचा व शहराचा गेली एक दशकापासून शुन्य विकास आहे. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जनतेने ही लढाई दीपक ताटे यांच्या रूपाने हाती घेतल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. उमेदवार जरी १७ असले तरी मतदार संघातील विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, मित्र मंडळांनी  त्यांना अंतर्गत पाठिंबा दिला आहे.

नुकताच पँथर्स रिपब्लिकन पार्टीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला असून पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष गौतम डोळस उपाध्यक्ष युवराज चंदनशिवे यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दीपक ताटे यांना दिले आहे. जाहीर पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, “भारतीय परिवर्तन सेनेचे अधिकृत उमेदवार दीपक भाऊ ताटे यांना जाहीर पाठींबा असून  रिपब्लिकन पार्टीच्या वतीने स्थानिक पातळीवर आम्ही  पक्षाच्यावतीने ज्या पार्ट्या गोरगरीबांच्या हितासाठी लढणाऱ्या व रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जातील व त्यांच्या चळवळीचा गाडा पुढे नेणाऱ्या अशाच पार्ट्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. म्हणून आम्ही या मतदारसंघात भारतीय परिवर्तन सेनेच्या दिपक ताटे यांना पाठिंबा दिला आहे.”

WhatsAppShare