पिंपरी, वाकडमध्ये दोन अपघात; दोघांचा मृत्यू

187

वाकड, दि. 17 (पीसीबी) : पिंपरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 60 वर्षीय पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. तर ताथवडे चौकाजवळ एका व्यक्तीने भरधाव वेगात दुचाकी चालवून अपघात केला. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी (दि. 16) पिंपरी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनेश नागनाथ लोभे (वय 29, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश यांचे वडील नागनाथ ज्योतिबा लोभे (वय 60) गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास महावीर चौक, पिंपरी येथे पायी चालत जात होते. झेब्रा क्रॉसिंगवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यातच फिर्यादी यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता गाडीसह निघून गेला. पिंपरी पोलीस तपास  करीत आहेत.

सहाय्यक पोलीस फौजदार व्ही जी बिरादार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 14) सायंकाळी साडेसहा वाजता राजेंद्र यादव शिंदे (वय 57, रा. मंगलनगर, थेरगाव) हे त्यांच्या दुचाकीवरून ताथवडे कडून डांगे चौकाकडे जात होते. ताथवडे चौकाजवळ बीआरटी रोड मध्ये राजेंद्र यांनी समोरील रिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात गंभरी जखमी झाल्याने राजेंद्र यांचा मृत्यू झाला. राजेंद्र स्वतःच स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare