पिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त

541

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी रेल्वेस्टेशन जवळ एक महिला ब्राऊनशुगर विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती एका खबऱ्याकडून अमली पादार्थ विरोधीत पथकाच्या पोलिसांना सोमवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास मिळाली होती. यावर पोलिसांनी सापळा रचून एका महिलेकडून ९.१०० मिली ग्रॅम ब्राऊनशुगर जप्त केली आहे.

लक्ष्मी उर्फ वैशाली रवी रणदिवे (वय २०, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिची साथीदार माया दिलीप रणदिवे ही फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अमली पादार्थ विरोधीत पथकाच्या पोलिसांना एक महिला पिंपरी रेल्वेस्टेशन जवळ ब्राऊनशुगर विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून लक्ष्मी रणदिवे हिला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता तिच्याकडे ४५ हजार रुपये किमतीची ९.१०० मिली ग्रॅम ब्राऊनशुगर आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली असून लक्ष्मीला अटक केली आहे. तर तिची साथीदार माया रणदिवे ही अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक स्वाती थोरात तपास करत आहेत.