पिंपरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

164

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी मधील सेनेट्रीचाळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यश राजेश बोहत (वय 19, रा. सेनेट्रीचाळ, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शक्ती रामरतन बोहत (वय 45), लता रामरतन बोहत (वय 62), यश जाधव (वय 21), लड्या उर्फ हर्ष अमर बोहत (वय 18), श्रुती शक्ती बोहत (वय 19), साहिल बोहत (वय 18), काजल (वय 20, सर्व रा. सेनेट्रीचाळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे करिष्मा कैरारिया हिच्यासोबत लग्न जमल्यापासून आरोपी नातेवाईक त्यांना रस्त्याने येताजाता शिवीगाळ करत होते. फिर्यादी, त्यांची आई, होणारी सासू, मेहुणी असे बोलत थांबले असताना आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी यांच्या कमरेवर चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना देखील मारहाण केली. शक्ती बोहत याला अटक करण्यात आली आहे.

याच्या परस्पर विरोधात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश उर्फ गुरु राजेश बोहत (वय 25, रा. सेनेट्रीचाळ, पिंपरी), सागर उर्फ मुन्ना प्रताप खैरारिया (वय 30, रा. लिंक रोड, चिंचवड), भरत मोहन बोहत (वय 20, रा. सेनेट्रीचाळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ आरोपी यश, त्याचा होणारा मेहुणा हे फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर आले. त्याच्याकडे लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके होते. त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यांना समजावण्यासाठी फिर्यादी यांची आजी गेली असता तिच्या डोक्यात बेदम मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांना देखील आरोपींनी मारहाण केली. सागर आणि भरत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.