पिंपरी महापालिकेसमोर ट्रकचालकाला बेदम मारहाण करुन लुटले

148

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – ट्रकचालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटन समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा एकच्या सुमारास पिंपरीतील महापालिके समोर असलेल्या मुंबई-पुणे रस्त्यावर घडली.
सुलतान खान (वय ३१, रा.बसवकल्याण, कर्नाटक) असे मारहाण झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सुलतान खान हे त्यांच्या ताब्यातील ट्रक मुंबईच्या दिशेने घेऊन चालले होते. यावेळी त्यांचा ट्रक पिंपरी महापालिकेसमोर असलेल्या मुंबई-पुणे रस्त्यावर आला असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांचा ट्रक अडवला. तसेच खान यांना हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १ हजार रुपये जबरदस्तीने हिस्कावून पळवून नेले. पिंपरी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.