पिंपरी महापालिकेत आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध  

227

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – भाजप आमदार राम कदम यांनी मुलीविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विरोधकासह महिला संघटनांनी राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, आज (गुरूवार) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.    

राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे म्हटले होते. या विधानानंतर  वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राज्याच्या महिला आयोगाने कदम यांना नोटीसही बजावली आहे.