पिंपरी महापालिकेतील सुरक्षा रक्षकाच्या नावाने नागरिकांना फसवणारा गजाआड  

380

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिेंपरी-चिंचवड महापालिकेत सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोयता अधिकाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ७) काळेवाडीतील पाचपीर चौक येथे करण्यात आली.

संदेश रामचंद्र जाधव (वय २१, रा. तानाजी नढेनाळ, काळेवाडी गावठाण) असे अटक करण्यात आलेल्या तोयता अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील एक जण “मी पिंपरी महापालिकेचा सुरक्षा अधिकारी असून, नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती” पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे संदेश जाधव नावाची  नेम प्लेट, चार स्टार, दोन पीसीएसी बॅच, एक खाकी रंगाची लाईन यार्ड लोकसेवक वापरतो तसे ओळखीचे चिन्ह आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.