पिंपरी महापालिकेच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

15

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस बुधवारी (दि. ११) पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक संतोष लोंढे, बाबासाहेब त्रिभुवन, सहआयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.