पिंपरी महापालिकेच्या आवारातील गुलाल उधळणीला मज्जाव घालण्याची मागणी

292

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या आवारातील कोणत्याही निवडणुकी संदर्भात गुलाल उधळण आणि फटाके वाजविण्यास मज्जाव घालावा, अशी मागणी अपना वतन संघटनेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेत सध्या राजकीय पदांचा खांदेपालट चालू आहे. त्यानिमित्ताने अतिउत्साहात राजकीय कार्यकर्ते प्रशासकीय व्यवस्थेला डावलून बेकायदेशीरपणे महापालिकेच्या आवारात गुलालाची उधळण करून फटाकेबाजी करतात.

या सर्व घटनांचा त्रास नागरिकांना होतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलावी, अन्यथा आयुक्तांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.