पिंपरी महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांची म्हाडाच्या संचालकपदी निवड

85

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांची पुणे म्हाडाच्या संचालकपदी निवड झाली आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भुजबळ यांचा सत्कार करून निवडीबद्दल अभिनंदन केले.

चेतन भुजबळ हे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. आमदार जगताप यांचे ते कट्टर समर्थक आहेत. पिंपरी-चिंचवडच्या पुनावळे-रावेत परिसरात ते राहतात. त्यांची म्हाडाच्या संचालकपदी निवड झाल्याने आमदार जगताप यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात, मनीष कुलकर्णी, नवीन लायगुडे आदी उपस्थित होते.