पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर

479

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा झाली असून पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून आज (मंगळवार) संपूर्ण देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांचे नाव आहे.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ५१ पदके पटकावत ३० राज्ये व चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुसरे स्थान राखले आहे. महाराष्ट्राच्या ८ पोलिसांना शौर्य पदकाने गौरवण्यात येणार असून तिघांना उल्लेखनीय कामगिरीसाठी तर ४० जणांना गुणवत्तापूर्व कामगिरीसाठी राष्ट्रपतीपदकाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांचही नाव असल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.