पिंपरी पालिकेच्या मुख्य इमारतीमधील लिफ्टमधून बाहेर पडताना शिपाई गंभीर जखमी

86

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील लिफ्ट मधून बाहेर पडताना एक पालिका शिपाई जखमी झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.१३) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

शरद भोंडवे असे या जखमी शिपायाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील लिफ्ट मधून शरद भोंडवे हे तिसऱ्या मजल्यावर जात होते. त्यावेळी अचानक वीज गेली आणि दोन मजल्यांच्यामध्ये लिफ्ट अडकली.  त्यांनी ताकतीचा वापर करून लिफ्ट उघडली. परंतु लिफ्ट मधून बाहेर पडताना भोंडवे हे कंबरेवर पडले यात ते जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.