पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमोतर्फे लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

168

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहराध्यक्ष व नगरसेवक रवी लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनुप मोरे, अजित कुलथे, दिपक नागरगोजे, युवराज लांडे, प्रविण सिंग, मधुकर बच्चे, राहुल शिंदे, मंगेश धाडगे, भूषण गायके, पंकज वेंगुर्लेकर, गणेश संभेराव, पवन जाधवार, भागवत मुंडे, राजेश राजपुरोहित, प्रदिप पटेल, अमित देशमुख, सचिन बंदी, ओंकार मोरे, अनिल सौंदळे आदी उपस्थित होते.