पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांबाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण ताब्यात, २४ दुचाक्या जप्त

123

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी विद्यापीठांबाहेर उभे राहून विद्यार्थीनींची छेडछाड करणे, तसेच बाहेरील विद्यार्थ्यांना दमदाटी करुन मारहाण करुन लुटमार करण्याच्या घटना समोर समोर आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पिंपरी पोलिसांनी आज (बुधवार) सकाळी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या परिसरातील ४२ रोडरोमियोंवर कारवाईचा बडगा उगारला. तसेच महाविद्यालयाचे ओळखपत्र नसलेल्या ४२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन परिसरात अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या २४ दुचाक्या जप्त केल्या आहेत.