पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 242 जणांवर खटले दाखल

31

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील 242 नागरिकांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खटले दाखल केले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमधून अनेक निर्बंध कमी केले आहेत. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. निर्बंध शिथिल होत असले तरी कोरोनाची साथ अजूनही सुरूच आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना अधिक काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे अशा बाबी कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक ठरणा-या आहेत. त्यामुळे कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक ठरणा-या बाबींवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. नागरिकांकडून उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाई केली जात आहे.

सोमवारी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार दाखल केलेले खटले –
एमआयडीसी भोसरी (12), भोसरी (14), पिंपरी (13), चिंचवड (11), निगडी (13), आळंदी (10), चाकण (0), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (27), वाकड (92), हिंजवडी (16), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (8), रावेत चौकी (12), शिरगाव चौकी (9)

WhatsAppShare