पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा 22 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

25

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 22व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पार्टीचे मुख्य कार्यालय पिंपरी येथे माजी महापौर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते पार्टीच्या ध्वजाचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी महापौर मंगलाताई कदम, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशालीताई काळभोर, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर तसेच आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

WhatsAppShare