पिंपरी चिंचवड शहरात धोक्याच्या उंबरठ्यावर, एका दिवसात १८६ रुग्ण

87

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 171 आणि महापालिका हद्दीबाहेरील 15 अशा 186 जणांचा रिपोर्ट आज (मंगळवारी) कोरोना पॉझिटिव्ह आला. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी रुग्णवाढ आहे. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 127 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. पवारनगर जुनी सांगवीतील 72 वर्षीय पुरुष, अंजठानगरमधील 47 वर्षीय पुरुष आणि कोथरुड येथील 47 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 2034 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील नढेनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, नेहरुनगर, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, दापोडी, काटेपिंपळे रोड पिंपळेगुरव, आनंदनगर चिंचवड, सानेवस्ती -चिखली,शास्त्रीचौक भोसरी,  इंद्रायणीनगर भोसरी, नंदादिप कॉलनी काळेवाडी, पवारनगर जुनी सांगवी, सदर्शननगर पिंपळे गुरव, नखातेनगर थेरगांव, बौध्दनगर पिंपरी, बिजलीनगर चिंचवड,‍ विठ्ठलनगर पिंपरी, पिंपरगांव, गांधीनगर पिंपरी,  नेहरुचौक दापोडी, भाटनगर पिंपरी, साईचौक बोपखेल, लिंकरोड पिंपरी, कासारवाडी, अंकुशचौक निगडी, वैदुवस्ती पिंपळेगुरव, तापकिरनगर काळेवाडी,दिघीरोड भोसरी, फिनोलेक्स कॉलनी काळेवाडी,  इंदिरानगर, भारतमाताचौक काळेवाडी, गवळीनगरभोसरी, मोरवाडी, माऊलीचौक वाकड, बौध्दनगर पिंपरी, रामनगर राहाटणी, कैलासनगर थेरगांव, ऍटलस कॉलनी नेहरुनगर, मोरेवस्ती निगडी, स्वामी समर्थ कॉलनी थेरगांव, वाल्हेकरवाडी, विठ्ठलमंदिर बोपखेल, पाटीलनगर चिखली, मिलिंदनगर पिंपरी, भारतमातानगर दिघी, महात्मा फुलेनगर भोसरी, किनार हॉटेल दापोडी, कन्हयापार्क थेरगांव, नानेकरचौक चिखली, पवारवस्ती दापोडी, लोंढेचाळ पिंपरी, नखातेनगर रहाटणी, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, आझादचौक निगडी, मुंजोबा वसाहत चिंचवड, कामगारनगर पिंपरी, पवारनगर सांगवी, फकिरा घुले चाळ बोपखेल, जवळकरचाळ कासारवाडी, संतगजानन महाराज नगर दिघी, जयभवानी नगर पिंपळेगुरव, चक्रपाणी वसाहत भोसरी, आदर्शनगर ताथवडे,  लिंबोरेवस्ती दापोडी परिसरातील 102 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 102 पुरुष आणि 69 महिलांचा समावेश आहे. तर, गणेशखिंड, वारजे माळवाडी, बोपोडी,  टिंगरेनगर विश्रांतवाडी, रास्तापेठ पुणे, खडकी,  औंध,  कसबापेठ,  दौंड येथील 15 जणांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये 8 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, नानेकरचाळ पिंपरी,साईबाबानगर चिंचवड,‍ निगडी, यमुनानगर, रावेत, आनंदनगर, बेलठीकानगर थेरगांव, शिवतीर्थनगर काळेवाडी,  जयभीमनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी,  काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, शाहूनगर, भाटनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी,  अजंठानगर, भारतनगर पिंपरी, स्वीसकॉन्टी थेरगांव, पाटीलनगर चिखली, जयमालानगर जुनी सांगवी, विठ्ठलनगर, खंडोबामंदिर चिंचवड, आदर्शनगर किवळे,  इंदिरानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, दत्तनगर दिघी, प्रियदर्शनीनगर सांगवी, सिंधुनगर,  रमाबाईनगर पिंपरी, फुगेनिवास कासारवाडी, ऐश्वर्यम चिखली, मयुरपॅनोरामा नेहरुनगर, सेक्टर २२ यमुनानगर, जयभीमनगर दापोडी,जाधवचाळ दापोडी, मोरवाडी,  रावेत,  गवळीनगर भोसरी,भिमाशंकरनगर दिघी, लिंबोरेवस्ती दापोडी, पीसीएमसीबिल्डींग निगडी, जळगांव, पेठ,  देहूरोड,  खेड,  येरवडा, हडपसर, वडगांव, कोंढवा येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 127 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 2034 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 1197 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 35 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 25 अशा 60 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 792 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

WhatsAppShare