पिंपरी-चिंचवड शहरातून पाच वाहने चोरीला

15

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील चाकण, पिंपरी, भोसरी आणि हिंजवडी परिसरातून पाच दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सोमवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सागर महादेव गराडे (वय 24, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गराडे यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 16 / सी एन 6449) अज्ञात चोरट्याने बालाजीनगर, चाकण येथून एका सोसायटीमधून लॉक तोडून चोरून नेली. ही घटना 22 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

अजय सुभान मुन्शी (वय 39, रा. भोसरी) यांची 24 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता आंबेडकर चौक, पिंपरी येथून 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी डी 1680) चोरून नेली. तर नवनाथ दत्तू खाडे (वय 35, रा. प्राधिकरण, निगडी) यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 45 / आर 6127) चोरट्यांनी 17 ऑक्टोबर रोजी टेल्को कंपनीसमोर, चिंचवड येथून चोरून नेली. वरील दोन्ही प्रकारांबाबत पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

विश्वनाथ बाळासाहेब जाधव (वय 31, रा. देहूगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए एल 4482) अज्ञात चोरट्यांनी कलासागर हॉटेल कासारवाडी येथील एसबीआय बँकेच्या समोरील पार्किंगमधून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय 35, रा. बुचडे पाटील नगर, मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई एल 2257) अज्ञात चोरट्यांनी बुचडे नगर, मारुंजी येथील सर्विस रोडवरून चोरून नेली. हा प्रकार 25 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare