पिंपरी-चिंचवड शहरातून अडीच लाखांची वाहने चोरीला

8

चिंचवडगाव, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातून एक कार आणि तीन दुचाकी अशी अडीच लाखांची चार वाहने चोरीला गेली आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 26) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तुलसीदास सुरेश कुलकर्णी (वय 40, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दीड लाख रुपये किमतीची एम एच 14 / बी ए 4571 ही कार केशवनगर, चिंचवड येथून चोरून नेली. ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडली आहे.
दिनेश पूनम चव्हाण (वय 22, रा. येरवडा, पुणे) यांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते रात्री सात वाजताच्या कालावधीत फिर्यादी चव्हाण यांची 50 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 12 / एस एस 2451) निघोजे येथील सॅंनी कंपनीच्या गेटसमोरील मोकळ्या पार्किंगमधून चोरून नेली.

सिद्धेश अशोक ताम्हाणे (वय 24, रा. कन्हेसर, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी डब्ल्यू 6250) 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता कासारवाडी रेल्वे स्टेशन येथील मेन गेट समोरून चोरून नेली आहे.
भारत यशवंत रानगट (वय 38, रा. मारुंजी, हिंजवडी. मूळ रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांची 40 हजारांची दुचाकी (एम एच 03 / ए 2060) त्यांच्या मारुंजी येथील सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

WhatsAppShare