पिंपरी- चिंचवड शहरातील रिक्षा चालकांसाठी जनजागृती मोहीम

162

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरक्षीत आणि सुरळीत रहावी म्हणून महामेट्रो, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी संयुक्तरित्या पिंपरी- चिंचवड शहरातील रिक्षा चालकांसाठी जनजागृती मोहीम राबवली.

सध्या शहरात महामेट्रोचे काम सुरु असल्याने विविध ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अपघाताच्या घटणा देखील घडत आहेत. शहरात रिक्षांची संख्या जास्त असल्याने तसेच शहरातील बरेच नागरिक हे रिक्षाने प्रवास करत असल्याने शहराची वाहतूक सुरक्षीत आणि सुरळीत सुरु रहावी म्हणून रिक्षा चालकांना वाहने वेगाने चालवू नयेत, ओव्हरटेक करू नयेत, मद्यपान करून वाहने चालवू नयेत, वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नये; यांसारख्या सूचना देण्यात आल्या.

ही मोहिम महामेट्रो, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रतिनिधी आणि वाहतूक विभागाचे पोलिस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थि होते.