पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद राहणार; शुक्रवारी सकाळी अनियमित

69

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरूवारी (दि. ३०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि. ३१) सकाळी अनियमित पाणीपुरवठा होणार आहे.