पिंपरी-चिंचवड येथील SK group सेक्युरीटी आणि बाऊंसर यांच्याकडून भोसरी Midc पोलिसांना मास्क वाटप

149

 

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड येथील SK group सेक्युरीटी आणि बाऊंसर  यांनी भोसरी Midc पोलिस यांना मास्क वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात काल (बुधवारी) कोरोनाचा एक रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळला आहे. हा रुग्ण फिलिपिन्स येथून प्रवास करुन शहरात आलेला आहे. शहरात दररोज एक ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पिंपरी शहरात एकूण कोरोना बाधित ११ रुग्ण झाले असून, पुण्यात आठ असे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १९ वर पोहचला आहे.

करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

याच पार्श्वभूमीवर स्वप्नील कांबळे, राजू वारभुवन, बापूसाहेब सरोदे, सुमित मोरे इरफान काझी, परमिंदर सिंग बाद sk group सेक्युरिटी आणि बाऊंसर यांच्याकडून भोसरी midc पोलिस यांना मास्क वाटप करून आरोग्याची काळजी घेणे जरूरी आहे असे ही भोसरी midc पोलिस यांना सांगण्यात आले.
यावेळी भोसरी Midc पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग सतीश नांदूरकर साहेब, PSI पुजारी, PSI दरेकर, ASI बाबासाहेब केदारे साहेब,
psi रावसाहेब बांबळे, Pi राजेंद्र कुंटे सिनियर व सर्व पोलीस कर्मचारी भोसरी आदी उपस्थित होते.