पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने दहावी उत्तीर्ण मुस्लिम विद्यार्थ्यांचा सत्कार

73

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद व पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा उर्दू माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पिंपरी येथील जमाते लतिफिया मस्जिद हॉलमध्ये कार्यक्रम झाला. पुण्याचे आयकर उपायुक्त स्वप्निल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक नौशाद शेख, पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर शेख यांनीही विद्यार्थ्यांना करियरबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जलील शेख, इरफान हमदुले, याकूब शेख, इब्राहिम शेख, शर्फूल्ला खान, मौलाना नसीबउल्ला, मौलाना मुबश्शीर, मौलाना नय्यर, मौलाना इस्लामुद्दीन, मौलाना कमर मुजल्ला, सलीम शेख, अजीम शेख, अफरोज नाथानी, फकीर मुलाणी, धम्मराज साळवे, नजीर तराजगार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अनस कुरेशी, मोहतेसीन सिद्दीकी, ईर्शाद कुरेशी, हाजी रौफ कुरेशी, नादिर बेग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक गुलाम मोहम्मद शेख यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव शफीउल्ला काझी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष अकील मुजावर यांनी आभार मानले.