पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

55

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त निगडी, भक्ती शक्ती चौक येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास  महापौर नितीन काळजे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसेविका शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे  रमेश भोसले, सामाजिक  कार्यकर्ते अरुण जोगदंड, नितीन घोलप, प्रा. धनंजय भिसे, संजय ससाने, शिवाजी साळवे, मनोज तोरडमल, गरीष सलगरकर, शाम कदम  आदी उपस्थित होते.

सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे,  फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप,  अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.