पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – नितीन काळजे

451

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलांसाठी विविध प्रकारची शिबिरे व प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा  प्रयत्न असल्याचे मत महापौर नितीन काळजे यांनी गुरूवारी (दि. ८) व्यक्त केले.

महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महिलांसाठी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर काळजे यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिताच्या माजी सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर,  महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, नगरसेविका माई ढोरे, आशा शेंडगे-धायगुडे, आरती चोंधे, सोनाली गव्हाणे, सुलक्षणा धर(शिलवंत), अनुराधा गोफणे, रेखा दर्शले, चंदा लोखंडे, आश्विनी बोबडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर , सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी एवले, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे, स्मिता जोशी, लीना बनसोड, नेत्रा पाटकर, डॉ. प्रणिता दराडे, रोहिणी पटवर्धन आदी व्याख्याते उपस्थित होते.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. महिलांनीच महिलांना यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.”

स्थायी समितीच्या माजी सभापती सrमा सावळे म्हणाल्या, “शहरात महिलांसाठी  मोठया प्रमाणात शौचालये उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्व मनपा व खाजगी शाळांना सॅनिटरी नॅपकीन मोफत पुरविणारे व्हेडींग मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  शहारातील २०० महिलांना वाहन चालविणेचे प्रशिक्षण देउन त्यांना वाहन खरेदीसाठी मनपाच्या वतीने वित्त पुरवठा करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा मनपाचा प्रयत्न असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.”

यावेळी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू पूजा शेलार, मनपा शाळेतील विशेष यश संपादन केलेल्या फुटबॉलपटू शेख राही बिलाल, अनुजा क्षिरसागर, निशा पारखे, महक शेख या गुणवंत विद्यार्थिनींचा व शहरातील १० वर्षे पूर्ण झालेल्या ५० महिला बचत गटांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कुटुंब जोडण्यामध्ये स्त्रीची भूमिका यावर विषयावर स्मिता जोशी, बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरण यावर विषयावर लीना बनसोड, स्वयंसिद्धता या विषयावर नेत्रा पाटकर, स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सर व ते टाळण्याचे सोपे उपाय या विषयावर डॉ. प्रणिता दराडे, समृद्ध जीवनाची संकल्पना या विषयावर रोहिणी पटवर्धन आदी मान्यवरांची व्याख्याने झाली. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमांनी महिलांची विशेष दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. रमेश भोसले यांनी आभार मानले.